आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIXमध्ये पाहा शाहरुखसह बी टाऊनचे इतर सेलेब्स कशी साजरी करतात ईद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून शाहरुख खानची मुलगी सुहाना, शाहरुख, त्याची बहीण शहनाज, पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन यांचे 2013च्या ईद पार्टी क्लिक झालेले छायाचित्र आहे.)
मुंबई - आज सर्वत्र धुमधडाक्यात ईदचा सण साजरा केला जातोय. सामान्यांसोबतच बी टाऊनचे सेलिब्रिटी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात. केवळ आपल्या कुटुंबीयांसोबतच नव्हे तर मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह ते हा सण साजरा करत असतात. यानिमित्ताने खास पार्टीचे आयोजनसुद्धा केले जाते.
गेल्या वर्षीच्या ईदविषयी बोलायचे झाल्यास, अभिनेता शाहरुख खान, जावेद जाफरी, शाद अली यांनी आपल्या घरी ईदचे जोरदार सेलिब्रेशन केले होते. या पार्टीमध्ये अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाली होती.
यादिवशी हे सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या अभिवादनाचाही आनंदाने स्वीकार करताना दिसतात. गेल्या वर्षी अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खानने आपापल्या घराच्या बाहेर येऊन चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले होते. यावेळी शाहरुख ब्लॅक पठानीमध्ये तर सलमान व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसला होता.
यावर्षीसुद्धा हे सेलेब्स ईदच्या पार्टीच्या तयारीत आहेत. या पार्टीची छायाचित्र लवकरच मीडियाकडे येईल. मात्र त्यापूर्वी आम्ही तुम्हाला गेल्या वर्षी या सेलिब्रिटींनी साजरी केलेल्या ईदची खास छायाचित्रे घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मागील वर्षी सेलिब्रिटींनी कशी साजरी केली होती ईद आणि कोणकोणते सेलिब्रिटी या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते...