आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Tever\', \'Fan\', \'Baby\' And More Much Awaited Movies Of 2015

Movie Release 2015: बॉक्स ऑफिसवर यावर्षी रिलीज होणार 25हून अधिक हे बिग बजेट सिनेमे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(यावर्षी रिलीज होणा-या सिनेमांचे पोस्टर)

मुंबईः 2015 या वर्षात अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर धूम करायला सज्ज झाले आहेत. यावर्षी प्रेक्षकांना विविध धाटणीच्या सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. आघाडीच्या कलाकारांसोबतच नवोदित कलाकारांचे सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत.
'तेवर', 'फैन', 'बजरंगी भाईजान', 'बाजीराव मस्तानी', 'प्रेम रतन धन पायो', 'बदलापुर', 'बेबी', 'जग्गा जासूस', 'रॉय'सह 20 हून अधिक सिनेमे यंदा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहेत.
मागील वर्षी म्हणजेच 2014 मध्ये सिल्व्हर स्क्रिनवर अनेक सिनेमे दाखल झाले होते. 'मेरी कोम', 'क्वीन' या स्त्रीप्रधान सिनेमांच्या सोबतीने 'बँग बँग', 'हॅप्पी न्यू ईयर', 'किक' यांसारख्या सिनेमांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. वर्षाच्या शेवटी रिलीज झालेला आमिर खान स्टारर 'पीके' यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.
2014मध्ये अनेक सिनेमांनी 100 कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला. काही सिनेमे 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले. आता यावर्षी रिलीज होणा-या सिनेमांकडूनही फिल्म इंडस्ट्रीला ब-याच अपेक्षा आहेत. हे सिनेमे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतील अशी आशा आपण व्यक्त करुयात.
एक नजर टाकुया यावर्षी बॉक्स ऑफिसवर दाखल होणा-या सिनेमांवर...