आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior NCP Leader RR Patil Is Dead, Bollywood Mourns R. R. Patil Death

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी ट्विटरवरुन वाहिली आर. आर. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.)

मुंबईः राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील (रावसाहेब रामराव पाटील) यांचे आज (सोमवारी) निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून आर.आर.पाटील यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती.
आर.आर.आबांचे पार्थिव मुंबईतील राष्‍ट्रवादी भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी (17 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यांतील तासगाव येथे अंत्यविधी करण्‍यात येणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक राजकारणी आणि बॉलिवूड-मराठी कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ''आर. आर. पाटील यांच्या निधनाचे वृत्त हा एक फार मोठा धक्का आहे. एक संवेदनशील नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि सच्चा माणूस आज आपल्यातून हिरावला गेला आहे'', या शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आबांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, आपच्या नेत्या अंजली दमानिया, दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेता आफताब शिवदासानी, संगीतकार कौशल इनामदार, भाजप नेते अरुण जेटली यांच्यासह अनेकांनी आर. आर. पाटील यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
काय म्हणाले हे मान्यवर, वाचा पुढील स्लाईड्सवर...