येणारा शुक्रवार अभिनेत्री प्रियांका चोप्रासाठी खूप स्पेशल आहे. यादिवशी तिचा बहुप्रतिक्षित 'मेरी कोम' हा सिनेमा रिलीज होणार आहे. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात प्रियांका बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. प्रियांकाने सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही.
'मेरी कोम' हा सिनेमा पाच वेळा वर्ल्ड चॅम्पिअन आणि ऑलंपिक स्पर्धेत मुष्टियुद्धातील कास्यपदक विजेती मेरी कोमच्या जीवनावर हा आधारित आहे. बॉक्सरची भूमिका वठवण्यासाठी प्रियांकाने
आपल्या बॉडीवर विशेष मेहनत घेतली आहे. यासाठी तिने मसल्स तयार केले. एकंदरीतच तिने या सिनेमासाठी खूप कठोर मेहनत घेतली आहे. हा सिनेमा प्रियांकाच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे.
'मेरी कोम'मध्ये प्रियांका बॉक्सिंग पंच लावताना दिसले. तसे पाहता बॉलिवूडमध्ये बॉक्सिंगसोबतच इतर खेळावरसुद्धा अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल यांसारख्या खेळांवर आधारित सिनेमांना प्रेक्षकांची पसंतीची पावतीसुद्धा मिळाली आहे. बी टाऊनमध्ये अधिक सिनेमे हे क्रिकेटवर फोकस करणारे आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या स्पोर्ट्सवर आधारित कोणकोणते सिनेमे रिलीज झाले आहेत...