आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood News 9 Celebrities, Who Died Very Early Www.Bhaskar.Com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणी वयाच्या 28व्या, कुणी 25व्या तर कुणी 19व्या वर्षी, कमी वयात जग सोडून गेले हे 12 सेलिब्रिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मोना खन्ना आणि जिया खान)
मुंबईः 'हाँटेड हाऊस', 'द लास्ट हॉरर'सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री सैयाम खन्ना हिने आपल्या राहत्या घरी चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे बुधवारी उघडकीस आले. सैयाम उर्फ मोना खन्ना 28 वर्षांची होती. प्रियकराशी सुरू असलेल्या वादास कंटाळून आत्महत्या केल्याची शंका सैयामने धाकटी बहीण रिया हिने व्यक्त केली आहे. सैयामने बहीण रियाला बाजारात पाठवून दिले होते. रिया घरी परतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत होती. मात्र, खोलीतून गाण्यांचा आवाज ऐकू आल्याने सैयामच्या चौकशीसाठी दार उघडले. तेव्हा सैयामने फॅनला गळफास घेतल्याचे रियाला दिसले. आत्महत्येमागे तिच्या प्रियकराचा हात असल्याचे सांगितले जाते.
तसे पाहता कमी वयात जगाचा निरोप घेणारी सैयाम एकमेव नाहीये. यापूर्वीही अनेक कलाकार कमी वयातच जगातून निघून गेले. कुणी वयाच्या 19 व्या तर कुणी 25व्या वर्षी मृत्यूला कवटाळले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला वयाच्या चाळीशीपूर्वीच जग सोडून गेलेल्या सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत.

>>जिया खान
>>मृत्यू : 3 जून 2013
>>वय : 25 वर्षे

गेल्यावर्षी 3 जून रोजी जियाने या जगाचा निरोप घेतला. मुंबईतील राहत्या घरी जिया मृतावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी जियाने आत्महत्या केल्याचे म्हटले होते, मात्र जियाची आई राबिया खान यांनी जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचे म्हटले होते. जियाच्या मृत्यूचे खरे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. याप्रकरणी पोलिसांनी जियाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोलीला अटक केली होती.
जिया बॉलिवूडमधील त्या सेलिब्रिटींपैकी आहे, ज्यांनी अगदी उमेदीच्या काळात जगाचा निरोप घेतला. वयाच्या केवळ 25 व्या वर्षी जियाने मृत्यूला कवटाळले. 20 फेब्रुवारी1988 रोजी न्यूयॉर्कमध्ये तिचा जन्म झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या इतर सेलिब्रिटींविषयी...