मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या पॅरिसमध्ये सुटी एन्जॉय करतेय. आलियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर', 'हायवे' आणि '2 स्टेट्स' हे तीन सिनेमे केले. हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.
यशाची हॅटट्रिक केल्यानंतर आलियाने आता थोडा ब्रेक घेऊन एन्जॉय करायचे ठरवले. आपल्या आई आणि बहिणीसोबत आलिया सुटीवर गेली आहे. पॅरिसनंतर ती लंडनची सफर करणार आहे.
हे स्टार्ससुद्धा एन्जॉय करत आहेत सुटी...
केवळ आलियाच नव्हे तर अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपल्या कामातून थोडा ब्रेक घेतला आहे. अभिनेत्री बिपाशा बसू न्यूयॉर्कमध्ये आपला वेळ घालवत आहे. तर सोनम कपूरने हॉलिडेसाठी मालदीवची निवड केली आहे. 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे तिचे बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतसह गोव्यात मस्ती करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलिब्रिटींचे सुटी एन्जॉय करतानाचे खास क्षण..