अलीकडेच अभिनेत्री
ऐश्वर्या राय बच्चनने एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. ब-याच महिन्यांपासून ऐश्वर्या या ब्रॅण्डसाठी शुटिंग आणि प्रमोशन करत आहे. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने सिनेमांऐवजी जाहिरातींवर आपले लक्ष केंद्रित केले. ऐश्वर्या अॅड मेकर्सची नेहमीच पहिली पसंत आहे. मग ती लक्सची जाहिरात असो किंवा प्रेशर कुकरची.
विशेष गोष्ट म्हणजे, या दोन्ही उत्पादनांच्या जाहिरातीत ऐश्वर्या तिचे पती अभिषेक बच्चनसह झळकली आहे. ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश आणि अभिची लक्सची जाहिरात बरीच गाजली होती. प्रेशर कुकरच्या जाहिरातीतसु्द्धा पुन्हा एकदा या जोडीच्या मॅजिकने कमाल केली. सांगितले जाते, की प्रेशर कुकरच्या या जाहिरातीसाठी या दोघांनी तब्बल तीस कोटींचे मानधन घेतले होते.
तसं पाहता जाहिरातींमध्ये आपली कमाल दाखवणारी ही एकमेव जोडी नाहीये. ऐश्वर्या आणि अभिषेकप्रमाणेच
सैफ अली खान-
करीना कपूर आणि
शाहरुख खान-गौरी खान याचे उदाहरण आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कोणकोणत्या रिअल लाइफ जोड्यांनी जाहिरातीत दाखवली आपली कमाल...