मुंबई: शाहरुख खानविषयी अनेक गोष्टी अनेकांना माहित आहेत. त्याच्या केलेल्या संघर्षांचे किस्सेसुध्दा चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहेत. तरीदेखील त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा आहे. आज बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणा-या शाहरुखचा 49वा वाढदिवस आहे. बॉलिवूडच्या या किंग खानकडे एकेकाळी राहायला घर नव्हते. त्यावेळी त्याला जूना मित्र विवेक वासवानीने आसरा दिला होता. ब-याच दिवस शाहरुख त्याच्या घरात वास्तवाला होता. त्यावेळी विवेकने त्याला घरातून काढून देण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. परंतु तो अपयशी ठरला. एका मुलाखतीत विवेकने ही गोष्ट स्पष्ट केली होती. आज दोघे चांगले मित्र आहेत.
शाहरुखला कोणतेही फिल्मी बॅकराउंट नाहीये, त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळवणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. शाहरुखने दूरदर्शनवर प्रसारित होणा-या 'फौजी' आणि 'सर्कस' या टीव्ही शोमधून भारतीय प्रेक्षकांमध्ये
आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. तो मिळत गेलेल्या संधीला स्वीकारत पुढे चालत राहिला. त्याने मोठी अपेक्षा उराशी बाळगली नाही. शाहरुखला विवेक वासवानी आणि अजीज मिर्जासारखे मित्र बॉलिवूडमध्ये भेटले. त्यावेळी शाहरुख सिनेमांसाठी संघर्ष करत होता.
त्याचवेळी हेमा मालिनी आपल्या 'दिल आशना है' सिनेमासाठी दिव्या भारतीसोबत एका नवीन चेह-याच्या शोधात होत्या. विवेक शाहरुखला निर्माता आणि दिग्दर्शकांना भेटवण्यास घेऊन जात असे. त्याने शाहरुखला या सिनेमाविषयी सांगितले. शाहरुखची या सिनेमासाठी निवड झाली. परंतु त्यापूर्वी 'दीवाना' सिनेमा करण्यात आला.
या सिनेमामध्ये शाहरुखचे पात्र ग्रे शेडसाठी होते, परंतु सिनेमा
बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. शआहरुख इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय बनला. त्याने बॉलिवूडमध्ये नवीन ट्रेंड सुरु केला. अँटी हिरोच्या प्रतिमेला स्थापित करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यानंतर 'दिल आशना है'सुध्दा रिलीज झाला. परंतु या सिनेमाला प्रेक्षकांनी नाकारले आणि फ्लॉप झाला. थोडा विचार केला तर कळते, की 'दिल आशना है' जर अगोदर रिलीज झाला असता तर आज शाहरुख कुठे असता? असो, 'बाजीगर' आणि त्यानंतर 'डर'ने त्याला बॉलिवूडमध्ये स्थापित केले. या काळात शाहरुख फिल्म इंडस्ट्रीचा ओळखीचा चेहरा बनला होता. सोबतच, तो फिल्मी पार्ट्यांची शानसुध्दा बनला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुख खानच्या सुरुवातील दिवसांतील काही निवडक छायाचित्रे...