आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पिता खान, रिद्धिमा कपूर, सिनेसृष्टीपासून दूर आहेत या Star Sisters

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अर्पिता खान आणि रिद्धिमा कपूर साहनी)
बी टाऊनमध्ये सध्या सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या लग्नाची चर्चा आहे. यापूर्वी अर्पिता खान एवढी चर्चेत कधीच नव्हती. सुपरस्टार सलमान खानची बहीण आणि घरी चित्रपटांची पार्श्वभूमी असूनदेखील अर्पिताने कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही.
अर्पिता सलमानचे वडील सलीम खान आणि त्यांच्या दुस-या पत्नी हेलन यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. या कुटुंबातील जवळजवळ सर्वच सदस्य फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. मात्र सलमानच्या दोघी बहिणी अलविरा खान आणि अर्पिता खान यांनी सिनेमात काम करण्याचा कधी विचार केला नाही.
अलविराचे लग्न बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीसोबत झाले आहे. अलविरा सलमान, सोहेल आणि अरबाजची धाकटी बहीण आहे. तिला दोन मुले असून अयान आणि एलिजा ही त्यांची नावे आहेत. आता त्यांची सर्वात धाकटी बहीण अर्पितासुद्धा लग्नगाठीत अडकणार आहे.
बी टाऊनमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या बहीणभावंडांचा सिनेसृष्टीशी प्रत्यक्ष संबध नसून त्यांनी दुस-या क्षेत्रात करिअर करणे पसंत केले आहे. यामध्ये रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा, संजय दत्तच्या बहिणी प्रिया आणि नम्रता, अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन नंदा या नावांचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटींविषयी...