आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींपासून ते आमिरपर्यंत, जाणून घ्या स्टार्स कसा साजरा करतात बर्थ डे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यस्त आयुष्यात आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करणे बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एक आव्हानात्मक काम असते. अलीकडेच अजय देवगणनेसुध्दा 'सिंघम 2'च्या शुटिंगच्या धावपळीतच आपला वाढदिवस साजरा केला. आपल्या कुटुंबीयांच्या म्हणण्यावरून त्याने शुटिंगमधून वेळ काढला होता. यानिमित्त जाणून घेऊया बॉलिवूडचे इतर सेलिब्रिटी आपला वाढदिवस कसा साजरा करतात.
वडिलांच्या आठवणीत करतात दान
आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत आणि मित्र परिवारासोबत साजरा करण्याचा बिग बींचा प्रयत्न असतो. त्यांनी आपला मागील वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला होता. नात आराध्याने अमिताभ यांना शुभेच्छा दिल्याने त्यांचा हा वाढदिवस खास बनला होता. ऐश्वर्याने आराध्याला या दिवशी एक गाणे म्हणायला शिकवले होते.
बिग बींनी आपल्या 70व्या वाढदिवसाच्या दिवशी एका संस्थेसाठी 25 लाख रुपये दान म्हणून दिले होते. त्यांनी आयोजित केलेल्या पार्टीत जवळपास 800 लोकांना आमंत्रित केले होते. अमिताभ जर मुंबई असले तर चाहत्यांनी भेटण्यास कदापि विसरत नाहीत. सोबतच, वडील हरिवंश राय बच्चन यांच्या आठवणीत ते कोणत्या ना कोणत्या संस्थेला देणगी देत असतात.
नोट: 70व्या वाढदिवसाच्या दिवशी अमिताभ यांच्या चाहत्यांनी मुंबईमध्ये एका पेंटिंग प्रदर्शन आयोजित केले होते. त्यामध्ये देशातील प्रसिध्द चित्रकारांनी बनवलेले अमिताभ यांच्या 70 पेंटिंग्सचा सामावेश होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आमिर खान, अजय देवगण आणि करीना कपूर कसा साजरा करतात वाढदिवस...