(अर्जुन कपूर आणि श्रीदेवी)
मुंबई - '2 स्टेट्स', 'गुंडे' आणि 'इशकजादे' यांसारखे उत्कृष्ट सिनेमे देणारा अभिनेता अर्जुन कपूरने अलीकडेच त्याची सावत्र आई श्रीदेवीसोबतच्या आपल्या नात्याविषयी खुलासा केला. एका टीव्ही शोदरम्यान अर्जुनला श्रीदेवीसोबतच्या नात्याविषयी विचारले गेले असता, तो म्हणाला, की त्या फक्त माझ्या वडिलांच्या पत्नी आहेत, त्यापेक्षा वेगळे आमचे नाते नाही.
अर्जुन कपूर निर्मता-दिग्दर्शक बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचा मुलगा आहे. श्रीदेवीसह लग्न करण्यासाठी बोनी कपूर यांनी अर्जुनच्या आईला घटस्फोट दिला होता. तेव्हापासून अर्जुन आणि श्रीदेवी यांच्यात खूप चांगली बाँडिंग कधीच बघायला मिळाली नाही. मात्र अर्जुनने कधी श्रीदेवीचा अपमानसुद्धा केला नाही.
अर्जुन कपूरच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये आणखी काही स्टार्स असे आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांच्या दुस-या लग्नाचा स्वीकार केलेला नाही. तर काहींनी सहज आपल्या सावत्र आईला स्वीकारले. एक नजर टाकुया अशाच काही नातेसंबंधांवर...