आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षी-आलियासह हे स्टार्स यांच्यावर करतात जिवापाड प्रेम, पाहा Petsसह सेलेब्सचे Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या पाळीव डॉगीसह
मुंबई: अक्षय कुमारचा 'एन्टरटेन्मेंट' उद्या (8 ऑगस्ट) रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'हॉलिडे'च्या यशानंतर अक्षय कुमारला या सिनमाकडूनसुध्दा अनेक अपेक्षा आहेत. 'एन्टरटेन्मेंट' एक कॉमेडी सिनेमा असून अक्षय पुन्हा एकदा प्रेक्षकांना लोटपोट हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे, सिनेमात अक्षयसह एक क्युट डॉगी दिसणार आहे. अक्षयने याविषयी सांगितले होते, की डॉग्स आणि मुलांसह शूटिंग करणे वाटते तेवढे सोपे नाहीये. सिनेमाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते, की अक्षयच्या या सिनेमात डॉग्सचे पात्रदेखील महत्वाचे राहणार आहे. सिनेमात डॉगच्या पात्राचे नाव 'एन्टरटेन्मेंट' आहे. अक्षय सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानसुध्दा अनेक ठिकाणी डॉगींसह दिसला.
बॉलिवूडमध्ये बरेच सेलेब्स आहेत, ज्यांना घरात डॉगी पाळण्याची आवड आहे. त्यातील काही मांजरी पाळण्याचेसुध्दा शौकीन आहेत. अमिताभ बच्चन, सलमान खानसारख्या स्टार्ससह सनी बिपाशा, सोनम यांनासुध्दा डॉगी पाळण्याची आवड आहे. जॅकलिन, आलिया, कल्कि या अभिनेत्रींनी मांजर पाळली आहे.
सोनाक्षी सिन्हा-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाकडे एक कूरो (Kuro) नावाचा डॉगी आहे. कूरोसह ती फावल्यावेळेत बरीच धमाल करते. तिने कूरोसह फोटो पोस्ट करून लिहिले होते, 'Kaala hai par dilwala ha'
आमच्या या स्पेशल पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला स्टार्स त्यांच्या पेट्ससह कशी धमाल करतात आणि कसा वेळ घालवतात ते दाखवणार आहोत...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टार्सचे आवडते पेट्स...