आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Who Are Of Almost Same Age But Look Different

रेखा-टीना, विद्या-नर्गिस, समवयीन आहेत हे स्टार्स, मात्र एक दिसतो तरुण तर एक वयस्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रेखा आणि टीना अंबानी)
मुंबईः बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रेखा यांनी नुकतीच वयाची साठ वर्षे पूर्ण केली. 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी वयाच्या 61व्या वर्षांत पदार्पण केले. वयाची साठ वर्षे पूर्ण करुनदेखील त्या पूर्वी एवढ्याच सुंदर दिसत आहेत. वाढत्या वयातदेखील त्यांच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे.
इंडस्ट्रीतील काही स्टार्स असे आहेत, जे पाच-दहा वर्षे करिअर करुन लाइमलाइटपासून दूर निघून गेले. याचे एक कारण म्हणजे त्यांचे लूक. वयोमानानुसार लूकमध्ये बराच बदल घडून येतो. मात्र काही स्टार्स त्याला अपवाद आहेत. वाढत्या वयातदेखील ते तरुणच दिसतात.
रेखा आपल्या काळातील जया बच्चन, टीना अंबानी या अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त फिट दिसतात. त्यांचे वय साठ वर्षे आहे, तर टीना अंबानी यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये वयाची 57 वर्षे पूर्ण केली. दोघींच्या वयात जवळजवळ अडीच वर्षांचे अंतर आहे. मात्र फिटनेस आणि लूक्समध्ये दोघींत कमालीचे अंतर आहे. या वयातदेखील रेखा तरुण दिसतात. तर टीना अंबानी यांच्या चेह-यावर वाढत्या वयाचा परिणाम स्पष्ट दिसू लागला आहे.
सलमानपासून ते गोविंदा, अनिल कपूर आणि बोमन इराणीपर्यंत, बॉलिवूडमध्ये असे अनेक समवयीन कलाकार आहेत. मात्र त्यांना बघितले असता त्यांच्या वयात बरेच अंतर असल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, समवयीन कलाकारांपैकी एक स्टार दिसतोय तरुण तर एकाच्या चेह-यावर दिसू लागला आहे वाढत्या वयाचा परिणाम...