आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars At Pro Kabaddi League Event Launching

प्रो कबड्डी लीग: लाँचिंगमध्ये बिग बींच्या पाया पडला किंग खान, पाहा इव्हेंटमध्ये पोहोचले सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इव्हेंटदरम्यान बिग बींचे पाय पडताना शाहरुख खान
मुंबई: मुंबईमध्ये काल (26 जुलै) प्रो कबड्डी लीगचे उद्धधाटन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स उपस्थि होते. अभिषेक बच्चनची टीम जयपूर पिंक पँथरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय बच्चनसह त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. तसेच, त्यांनी सचिन तेंडूलकरलासुध्दा आमंत्रित केले होते. किंग खान अर्थातच शाहरुख खानसुध्दा या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचला होता. शाहरुख स्टेडिअममध्ये पोहोचताच बिग बींचे पाय पडला. बिग बींनीसुध्दा त्याला मोठ्यापणाने त्याला अलिंगन दिले.
त्यानंतर किंग खानने जया बच्चन यांचाही आशीर्वाद घेतला. बिग बी, शाहरुखव्यतिरिक्त आमिर खान, सोनाली बेंद्रे, सुनील शेट्टी, कुणाल कपूर, मोहित रैना आणि गौरव कपूरसुध्दा या इव्हेंटमध्ये सामील होता. उद्धाटन मॅच यू मुंबई आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर किंग पिंक पँथर यांच्यात होती. मात्र, सामन्याच्या पहिल्याच दिवशी जयपूर पिंक पँथरला पराभवाचा सामना करावा लागला. यू मुंबईने या सामन्यात 45-31 असे विजय मिळवून अभियानाची धमाकेदार सुरुवात केली.
प्रो कबड्डी लीगच्या उद्धाटन समारंभात पोहोचलेल्या सेलिबिटींची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...