आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखची पहिली कमाई होती 50 रुपये, जाणून घ्या बड्या स्टार्सच्या पहिल्या कमाईविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जरा तो क्षण आठवा, ज्यावेळी तुमच्या मेहनतीची पहिली कमाई तुमच्या हाती पडली होती... तो क्षण विसरणे सामान्यांबरोबरच आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नक्कीच कठीण आहे. आज आम्ही बॉलिवूड स्टार्सच्या आठ आकडी मानधनाबद्दल मुळीच बोलत नाही आहोत. उलट त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कमाईबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तब्बल 3600 कोटींचा मालक असलेल्या शाहरुखची पहिली कमाई केवळ पन्नास रुपये होती, असं जर आम्ही तुम्हाला सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल का? हे वाचून कदाचित तुम्ही अचंबित व्हाल. पण बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पहिली कमाई होती केवळ पन्नास रुपये. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कॉन्सर्टमध्ये त्याने हे पैसे कमावले होते. रंजक गोष्ट म्हणजे शाहरुखने हे पन्नास रुपये दिल्लीहून आग्रा येथे जाणा-या ट्रेनच्या तिकिटासाठी खर्च केले होते. या पैशांत तो ताजमहल बघायला गेला होता.
आज शाहरुखने आपल्या बळावर तब्बल 3600 कोटींचे साम्राज्य उभे केले आहे. त्याने हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या अभिनेत्यांना मागे टाकत जगभरातील गर्भश्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने टॉम क्रूज, जॉनी डेपसारख्या प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्यांना या यादीत मागे टाकले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ज्या कलाकारांनी अगदी कमी पगारापासून आपल्या करिअरला सुरुवात केली, अशा काही बॉलिवूड स्टार्सविषयी सांगत आहोत. या अमिताभ बच्चन यांच्यापासून ते सोनम कपूरसारख्या बड्या स्टार्सच्या नावाचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या स्टार्सची किती होती पहिली कमाई....