(फाइल फोटो - सुश्मिता सेन)
बॉलिवूडमधील अनेक कलावंत अभिनयासोबतच दुस-या क्षेत्रातही कार्यरत आहे. त्यांचा सिनेमा हिट होवा अथवा न होवो, त्यांचा बिझनेस मात्र चांगला सुरु असतो. येथील अनेक कलावंत रेस्तराँपासून ते फॅशन प्रॉडक्ट्सच्या विक्रीत सक्रिय आहेत.
अलीकडेच एका सर्वेक्षणानुसार, बॉलिवूडचा किंग खान सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे. शाहरुखकडे जवळपास 3660 कोटींची संपत्ती आहे. सिनेमांव्यतिरिक्त इतर बिझनेसमधून तो कमाई करतो. शाहरुखचे स्वतःचे रेड रिलीज एन्टरटेन्मेंट हे प्रॉडक्शन हाऊस आहे. याशिवाय स्पेशल इफेक्ट्स कंपनी रेड चिलीज वीएफएक्स, आयपीअएल टीम आणि चिल्ड्रन एन्टरटेन्मेंट पार्क किडजेनिया आहे.
शाहरुखप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनसुद्धा एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिचे बॉलिवूड करिअर विशेष चालले नाही. मात्र बिझनेसमध्ये ती यशस्वी झाली आहे. सुश्मिताकेड आय एम शी ही मिस युनिव्हर्स इंडिया फ्रेंचाइजी आहे. याशिवाय ती फिचर फिल्म्ससुद्धा प्रोड्युस करते. तंत्र एन्टरटेन्मेंट प्रा. लि. नावाने तिने स्वतःची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे मुंबईत जवळपास 2500 चौ. फुटाचे ऑफीस आहे. त्याचे इंटेरियर स्वतः सुश्मिताने केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच आणखी काही अॅक्टर ते बिझनेसमन झालेल्या स्टार्सविषयी...