मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानने थम्सअप सेल्फी कॉन्टेस्टच्या विजेत्यांसह सेल्फी क्लिक केले. सलमान खान थम्सअपचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. या स्पर्धेच्या नियमांनुसार चाहत्यांना थम्सअपसह तुफानी स्टाईलमध्ये सेल्फी क्लिक करायच्या होत्या. जे सेल्फी सर्वाधिक रिट्विट होईल, त्यांना सुपरस्टार सलमानची भेट घेण्याची संधी या स्पर्धेअंतर्गत देण्यात मिळाली.
सलमान सध्या त्याच्या आगामी 'किक' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात जॅकलिन फर्नांडिस, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रणदीप हुड्डा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. निर्माता साडिद नाडियाडवाला या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 'किक'च्या पहिल्या ट्रेलर लाँचपासूनच रेकॉर्ड बनला आहे. यूट्युबवर आत्तापर्यंत 'किक'चा ट्रेलर एक कोटी वीस लाख लोकांनी पाहिला आहे.
तसे पाहता सोशल नेटवर्किंग साइट्सवर सेल्फीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ऑक्सफोर्डच्या वतीने डिक्शनरीत पहिल्यांदा समावेश झालेल्या 'सेल्फी' या शब्दाचा अर्थ स्वतःद्वारे काढलेले छायाचित्र असा होतो. SELFIE (सेल्फी) हा शब्द ऑक्सफोर्डसाठी नवीन आहे, मात्र ट्विटवर facebook आणि instagram यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सशी खूप आधीपासून हा शब्द जोडला गेला आहे.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रत्येक दिवशी हजारो सेल्फी पोस्ट केले जातात आणि सेल्फी पोस्ट करण्यात सामान्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
divyamarathi.comकडे असेच काही सेल्फीजचे कलेक्शन आहे, जे आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. सेलिब्रिटींचा सेल्फी मूड बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...