आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood stars in colors screen awards photo feature

कलर्स स्‍क्रीन अवॉर्ड्स समारंभात बॉलिवूडकरांनी आणली बहार(फोटो फिचर)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अठराव्‍या कलर्स स्‍क्रीन अवॉर्ड समारंभात बॉलिवूडमधील तमाम दिग्‍गज मंडळींनी गर्दी केली होती. शनिवारची संध्‍याकाळ 'रॉकस्‍टार' या चित्रपटासाठी खरोखरीच खूप 'रॉकिंग' गेली असे म्‍हणायला हरकत नाही. चित्रपटाला तीन महत्‍त्‍वाचे अवॉर्ड्स मिळाले. 'रॉकस्‍टार'साठी रणबीर कपूरला सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता, ए.आर.रहेमानला सर्वोत्‍कृष्‍ट संगीत दिग्‍दर्शन तर चित्रपटातील 'फिर से उड चला' या गाण्‍यासाठी मोहितला अवॉर्ड मिळाले.
सर्वोत्‍कृष्‍ट चित्रपटाचे अवॉर्ड कॅटरीनाच्‍या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि विद्या बालनच्‍या 'द डर्टी पिक्‍चर' या चित्रपटांना मिळाले. 'द डर्टी पिक्‍चर'मधील भूमिकेसाठी विद्या बालनला सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचे अवॉर्ड मिळाले.
या समारंभात एकापेक्षा एक बहारदार नृत्‍ये सादर करून बॉलिवूडकरांनी प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरूख खान आणि माधुरी दीक्षित यांनी 'छम्‍मक छल्‍लो' या गाण्‍यावर जोरदार ठुमके लगावले. दोघांनी अनेक वर्षांनंतर एकत्र नृत्‍य पेश केले. शाहरूखने विद्या बालनसोबत 'छूना ना छूना ना' या गाण्‍यावर नृत्‍य सादर केले. कॅटरीना कैफने 'अग्निपथ'मधील तिच्‍या 'चिकनी चमेली' या आयटम नंबरवर अस्‍सल मराठमोळे नृत्‍य सादर करून रसिकांना आपल्‍या अदांनी घायाळ केले.
यावेळी शाहरूख खान, जुही चावला, नील नितीन मुकेश, दीपिका पदुकोण, आसिन, अनुष्‍का शर्मा, रणबीर कपूर, उदीता गोस्‍वामी, नीतू कपूर, इत्‍यादी कलाकार आवर्जून उपस्थित होते.