आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : 'मैं तेरा हीरो'ची ग्रॅण्ड सक्सेस पार्टी, सेलेब्सची जमली मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डेविड धवन दिग्दर्शित 'मैं तेरा हीरो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. या सिनेमाची पटकथा मिलाप जावेरी यांनी लिहिली आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत भारतात 47 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. या सिनेमाचा निर्मिती खर्च 40 कोटी इतका होता. सिनेमाला मिळालेले यश पाहून दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनमधील सेलेब्सची मांदियाळी जमली होती.
या पार्टीत दिग्दर्शक डेविड धवन, अनुपम खेर, गुलशन ग्रोव्हर, एकता कपूर, तुषार कपूर, हुमा कुरैशी, नील नितिन मुकेश, शक्ति कपूर, सोनू सूद, कायनात अरोरा, नावेद जाफरी, सिद्धांत कपूर, केन घोष, पुनीत मल्होत्रा, मुश्ताक शेख, करिश्मा तन्ना, निखिल अडवाणी, मंजिरी फडनिस, निशिका लुल्ला, मरियम जकारियासह बरेच सेलेब्स जमले होते.
'मैं तेरा हीरो' हा सिनेमा 4 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात डेविड धवन यांचा मुलगा वरुण धवन, इलियाना डिक्रूज, नर्गिस फाखरी मेन लीडमध्ये होते. वरुण धवनचा हा दुसरा सिनेमा आहे. वरुणने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती.
पुढील स्लाईड्सवर पाहा या ग्रॅण्ड पार्टीची खास छायाचित्रे..