आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind the scene:पाहा सिनेमात बघायला न मिळालेली स्टार्सची झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जेव्हा प्रेक्षक एखादा सिनेमा बघून थिएटरबाहेर पडतात, तेव्हा त्यातील कलाकारांविषयी ते नक्की चर्चा करतात. मात्र सिनेमातील लूक आणि अभिनयासाठी या कलाकारांनी किती परिश्रम घेतले, याविषयी प्रेक्षकांना फारसे ठाऊक नसते. शुटिंगदरम्यान कलाकारांचे मेकअप करणे, आराम करणे, फावल्या वेळेत टाइमपास करणे, याविषयी प्रेक्षक अनभिज्ञ असतात.
मात्र जे लोक सध्याच्या काळात सोशल नेटवर्किंग साईट्सवर अॅक्टिव आहेत, त्यांना शुटिंगदरम्यानची कलाकारांची झलक बघायला मिळत असते. सिनेमातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते शुटिंगदरम्यानच्या हालचाली सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करत असतात. यूटीव्हीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही अशीच शुटिंगदरम्यान क्लिक करण्यात आलेली छायाचित्रे उपलब्ध आहेत.
शुटिंगवेळी क्लिक करण्यात आलेली छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
नोट - वरील छायाचित्र 'बर्फी' सिनेमाच्या शुटिंगवेळी क्लिक करण्यात आले असून यामध्ये प्रियांका चोप्रा मेकअप करताना दिसत आहे.
सर्व फोटो साभार - instagram.com/utvfilms