आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी सर्व इंडस्ट्री सज्ज, शाहरुख-आमिर येणार समोरा-समोर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा निर्माता करण जोहर आज (25 मे) 42 वर्षांचा झाला आहे. या निमित्तावर सेलिब्रेशन करण्यासाठी जवळपास सर्व फिल्म इंडस्ट्री सज्ज आहे.
खास गोष्ट म्हणजे, मागील वर्षासारखी यंदा करणची बर्थ डे पार्टी छोट्या सेटनवर होणार नाहीये. करण जोहर यावेळी 42वा वाढदिवस धूमधाममध्ये साजरा करणार आहे.
अद्याप त्याच्या योजनेची काहीही कल्पना नाहीये. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
मागील वर्षी करण जोहरच्या जवळचा शाहरुख खान बर्थ डे पार्टीत सामील होऊ शकला नव्हता. तेव्हा शाहरुख हैदराबादमध्ये रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. दुसरीकडे, आमिर खानसुध्दा पार्टीत खूप विचित्र वेशभूषेत पोहोचला होता.
यावर्षी शाहरुख करणच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहोचणार का? हे बघणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच, आमिर खान कशा वेशभूषेत येणार. हे दोन्ही सुपरस्टार समोरा-समोर आले तर कशी प्रतिक्रिया बघायला मिळणार?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा मागील वर्षी करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...