आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक-किशोर कुमारपासून ते प्रिती-शिल्पापर्यंत, जाणून घ्या स्टार्सचे Real Names

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- (L)किशोर कुमार आणि अशोक कुमार)
हिंदी सिनेसृष्टीत 'दादामुनी' नावाने ओळखले जाणारे अभिनेते अशोक कुमार यांची आज 103वी जयंती आहे. 13 ऑक्टोबर 1911 रोजी अशोक कुमार यांचा जन्म झाला होता. अशोक कुमार यांची सिनेसृष्टी अभिनेता म्हणून नव्हे, तर दिग्दर्शक-निर्माता म्हणून काम करायची इच्छा होती. अशोक कुमार यांना त्यांचे चाहते ऑन स्क्रिन नावाने ओळखतात. मात्र त्यांचे खरे नाव कुमुदलाल कुंजीलाल गांगुली असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. बिहारमधील भागलपूर येथे जन्मलेले अशोक कुमार यांचे सुरुवातीचे शिक्षण कोलकातामध्ये झाले होते.
भावंडांमध्ये सर्वात थोरले होते अशोक कुमार...
चार बहीण-भावंडामध्ये अशोक कुमार सर्वात मोठे होते. बालपणापासूनच हिंदी सिनेसृष्टीचे आकर्षण त्यांना होते. अशोक कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे धाकटे भाऊ अनूप आणि किशोर कुमार यांनीदेखील बॉलिवूडमध्ये करिअर केले.
योगायोगाने झाले अभिनेते...
1936 सालीची ही गोष्ट आहे. बॉम्बे टॉकीज 'जीवन नैया' या सिनेमाची निर्मिती करत होते. मात्र तेव्हाच या सिनेमातील अभिनेत्याने काही कारणास्तव सिनेमात काम करण्यास नकार दिला. तेव्हा बॉम्बे टॉकीजच्या मालकांना अशोक कुमार यांना सिनेमात काम करण्याची विनंती केली. अशाप्रकारे अशोक कुमार यांच्या अभिनय करिअरला सुरुवात झाली. त्यांनी निर्माते म्हणून मशाल, जिद्दी, मजबूर या सिनेमांची निर्मती केली. 1949मध्ये त्यांची निर्मिती असलेल्या 'महल' या सिनेमाने मधुबालाला हिंदी सिनेसृष्टीतीली आघाडीच्या अभिनेत्रींच्या पंक्तीत बसवले.
10 डिसेंबर 2001 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अशोक कुमार यांची प्राणज्योत मालवली.
अशोक कुमार यांच्या प्रमाणेच त्यांचे धाकटे बंधू किशोर कुमार यांनीदेखील आपले नाव बदलून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. आज किशोर कुमार यांची पुण्यतिथी (13 ऑक्टोबर 1987) आहे.
बॉलिवूडमध्ये दिलीप कुमार यांच्यापासून ते गोविंदा, अजय देवगण, अक्षय कुमार, प्रिती झिंटापर्यंत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी नाव बदलून सिनेसृष्टीत पदार्पण केले. अलीकडेच या यादीत गोविंदाची मुलगी नर्मदा हिच्या नावाची भर पडली आहे.
पुढे वाचा, या स्टार्सनी बदलले आपले खरे नाव...