आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 13 PIX: या स्टार्सनी बालपणी दाखवली होती कमाल, आता मोठे होऊन करतायेत धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी बॉलिवूडमध्ये बालकलाकार असलेली हंसिका मोटवानी आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री बनली आहे. आहे. साउथमध्ये हंसिकाने अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांसह काम केले आणि अनेक अवॉर्ड्सुद्धा आपल्या नावी केले आहेत. हंसिका मागील काही दिवसांपासून अफेअरमुळे चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंड सिम्बूसह पहिले ब्रेकअप आणि नंतर पॅचअपच्या बातम्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
2003मध्ये 'हवा' या सिनेमात ती बालकलाकार म्हणून झळकली होती. तिला खरी ओळख मिळाली ती 'कोई मिल गया' या सिनेमामुळे. हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा स्टारर या सिनेमात हंसिकाने हृतिकच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. याशिवाय 'आबरा का डाबरा' या सिनेमातही ती बालकलाकार म्हणून झळकली होती.
2007 मध्ये हंसिकाने 'आप का सुरुर' या सिनेमात हिमेश रेशमियासोबत लीड रोल साकारला होता. वयाच्या केवळ 16व्या वर्षी हंसिकाला लीड अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. या सिनेमात ती ग्लॅमरस अंदाजात पडद्यावर अवतरली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. मात्र हंसिकाला लीड अॅक्ट्रेसच्या रुपात ओळख प्राप्त झाली. या सिनेमानंतर हंसिका 'मनी है तो हनी है' या सिनेमात चक्क गोविंदासह रोमान्स करताना दिसली होती. हा सिनेमासुद्धा अपयशी ठरला आणि हंसिकाचे बॉलिवूड करिअर जवळजवळ संपुष्टात आले. आता हंसिकाने आपला मोर्चा हॉलिवूड सिनेमांकडे वळवला असून ती तेथील नावाजलेली अभिनेत्री ठरली आहे.
तसे पाहता हंसिकाप्रमाणेच बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली आणि आता ते नावाजलेले अभिनेता-अभिनेत्री ठरले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच काही बॉलिवूड स्टार्सविषयी...