आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही फिट आणि सुंदर दिसतात शर्मिला, वयाला मात देताहेत हे 7 बॉलिवूड सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शर्मिला टागोर यांचे जूने आणि आताचे छायाचित्र)
शर्मिला टागोर हिंदी सिनेसृष्टीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्या अभिनयात आजही सक्रिय आहेत. 70 वर्षांच्या झालेल्या शर्मिला यांनी आपल्या फिल्मी करिअरला 1959मध्ये बंगाली सिनेमातून सुरुवात केली. त्यांचा पहिला बॉलिवूड सिनेमा 1964मध्ये आलेला 'कश्मीर की कली' होता.
शर्मिला बिकिनी परिधान करणा-या पहिल्या बॉलिवूड अभिनेत्री आहेत. फिल्मफेअर मासिकाच्या कव्हर पेजसाठी त्यांनी बिकिनी परिधान करून फोटो काढले होते. शिवाय त्या 'एन इवनिंग इन पॅरिस' सिनेमातसुध्दा बिकिनीमध्ये दिसल्या होत्या. त्यांच्या बोल्डनेसवर नेहमी तीव्र प्रतिक्रिया त्याकाळी येत होत्या. बॉलिवूडमध्ये बोल्ड फॅशन ट्रेंड सेटर राहिलेल्या शर्मिला आजसुध्दा खूप फिट आणि ग्लॅमरस आहेत.
शर्मिला टागोर 2004पासून 2011पर्यंत इंडियन फिल्म सेन्सॉर बोर्डच्या चेअरपर्सन होत्या. त्यांना भारत सरकारने पद्मभूषणने सन्मानित केले आहे. त्यांना शेवटचा सिनेमा 2010मध्ये आला 'ब्रेक के बाद' हा होता. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की त्यांना बिकिनी परिधान केल्याने खूप हंगामा झाला होता. परंतु त्यांना काही चुकीचे केले नव्हते. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय सिनेमाच्या अभिनेत्री रील आणि रिअल लाइफमध्ये खूप सशक्त झाल्या आहेत.
रेखा, अमिताभ बच्चनपासून नीतू सिंह, श्रीदेवीपर्यंत बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या वयाला मात देऊन कामात सक्रिय दिसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही स्टार्स जे वयस्कर असूनदेखील दिसतात ग्लॅमरस आणि फिट...