आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 Celebsवर लागला आहे लैंगिक शोषणाचा आरोप, मात्र कधीच झाला नाही सिध्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'जग्गू दादा' नावाने प्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॉफ 58 वर्षांचे झाले. 1 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांनी वाढदिवस साजरा केला. जॅकी बॉलिवूडचे यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. आजसुध्दा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत.
जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीचे नाव आयशा आहे. दिर्घकाळाच्या रिलेशननंतर 5 जून 1987मध्ये दोघे लग्नगाठीत अडकले. 2009मध्ये दोघे विभक्त झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र एका मुलाखतीत आयशा यांनी या केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. आयशा आणि जॅकी यांना मुलगा टायगर आणि मुलगी आयशा ही दोन मुले आहेत. कधीकाळी मॉडेलिंग केलेल्या आयशाने एकाच सिनेमात काम केले. लग्नानंतर ती लाइमलाइटपासून दूर राहायला लागली. तिने 'जिस देस मे गंगा रहता है' (2000), 'बूम' (2003), 'ग्रहण' (2001)सारखे सिनेमे निर्मित केले आहेत. जॅकी एन्टरटेमेंट लिमिटेड नावाने आयशा आणि जॅकी मीडिया कंपनी चालवतात.
तब्बू यांची छेड काढल्याचा लागला होता आरोप-
जॅकी यांची फिल्मी इंडस्ट्रीमध्ये सभ्य आणि साधेपणाची प्रतिमा आहे. परंतु एकेकाळी त्यांच्यावर गंभीर आरोप लागला होता. अभिनेत्री तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांनी आजपर्यंत एकाही सिनेमात एकत्र काम केलेले नाही. यामागील कारण दोघांमधील वाद आहे. बातम्यांनुसार, तब्बूची थोरली बहीण आणि भिनेत्री फराह नाजने जॅकी श्रॉफ यांच्यावर आरोपा लावून एका मासिकाच्या मुलाखतीत सांगितले होते, की जॅकी यांनी तब्बूसोबत छेडछाड केली होती.
फराहच्या सांगण्यानुसार, ही घटना एका सिनेमाच्या शूटिंगवेळी घडली होती. त्यावेळी तब्बू 14 किंवा 15 वर्षांची असेल. मात्र जॅकी यांच्यावर लागलेला हा आरोप कधीच स्पष्ट झाला नाही. या प्रकरणी तब्बूने एका मुलाखतीत सांगितले होते, की असे काहीच घडले नव्हते आणि कोणतेही प्रकरण दाखल करण्यात आले नव्हते.
केवळ जॅकी आणि तब्बूच नव्हे यापूर्वीही अनेक कलाकार आहेत, जे अशा प्रकरणात अडकले आहेत. मात्र त्यांच्यावर लागलेले आरोप सिध्द झालेले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असेच काही प्रकरण...