आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींच्या स्वच्छता मोहिमेत बॉलिवूडकर सहभागी, हृतिक-जावेद यांनी हातात घेतला झाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता हृतिक रोशन)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लीन इंडिया कॅम्पेनशी बॉलिवूडनेसुध्दा सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांनी या मोहिमेत अनेक सिता-यांना सहभागी होण्यास निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये सलमान खान, कमल हसन, प्रियांका चोप्रा यांचे नाव सामील आहेत. त्यांच्या अपीलनंतर इतर सेलेब्सनीसुध्दा या मोहिमेत भाग घेतला.
2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी हृतिक आणि सुभाष घई हे इंटरनॅशनल स्कूलमध्ये पोहोचले होते. तिथे हृतिकने एक झाड लावले. सोबतच, सुभाष घई यांच्यासोबत झाडूनदेखील घेतले. दोघांनी या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याची साक्षी म्हणून हाताची एक प्रिन्ट दिली. या इव्हेंटदरम्यान हृतिकने 'बँग बँग'चे प्रमोशनसुध्दा केले. इव्हेंटमध्ये सर्वांनी गळ्याभोवती हिरव्या रंगाचा रुमाल गुंडाळलेला होता. पंतप्रधान यांच्या अपीलानंतर बॉलिवूडच्या अनेक स्टार्सकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
बॉलिवूड स्टार्सचे टि्वट
सलमान खान: Me & my Foundation accept the invite from our honourable Prime Minister for Swachh Bharat and will give our 100% for #MyCleanIndia.

दीया मिर्जा: #LalBahadurShashtri #MahatmaGandhi Your birth anniversary is being celebrated by this pledge we take.

प्रियांका चोप्रा: I humbly accept respected Prime Minster Narendra Modiji's challenge. This is an idea that is long overdue #CleanIndiaCampaign @PMOIndia
मोहिमेत जावेद जाफरीही झाले सामील
या मोहिमेत जावेद जाफरी यांनीही झाडू हातात घेतला. जावेद यांनी याविषयी सांगितले, '50 वर्षांपूर्वी 4 ऑक्टोबर 1964 रोजी मी ग्वालिअरहून मुंबईला रवाना झालो होतो. पहिले पाऊल मी याच मुंबई सेंट्रल स्टेशनवर ठेवले होते. आज मी त्याच ठिकाणी या मोहिमेअंतर्गत स्वच्छता करत आहे. या मोहिमेचे मी समर्थन करतो.'

प्रियांका चोप्राही झाली सामील
प्रियांका चोप्रानेसुध्दा या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. याविषयी प्रियांका म्हणते, 'मी विनम्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे आव्हान स्वीकार करते. समाजात बदल आणण्यासाठी ही मोहिम खूप चांगली आहे. सर्वांनी एकत्र येऊन या मोहिमेला यशस्वी करावे. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पंतप्रधानांच्या मोहिमेत सामील झालेल्या बॉलिवूडकरांचे फोटो...