आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Taller Actresses Than Actors On Screen

उंच हिरोईन, ठेंगणा हीरो, आमिर-शाहरुखने आणला बॉलिवूडमध्ये हा Trend

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः अनुष्का शर्मा आणि आमिर खान)

जास्त उंचीमुळे बॉलिवूड करिअरवर फ्लॉपचा शिक्का लागलेल्या अनेक अभिनेत्री येथे आहेत. ऐंशी-नव्वदच्या काळात उंच अभिनेत्रींना निवडक अभिनेत्यांसोबतच काम करता आले. जास्त उंचीमुळे अभिनेत्रींवर अभिनय करिअरला फुलस्टॉप लावण्याची वेळ आली. मात्र आता ही मानसिकता बदलत असून याचे ताजे उदाहरण आहे आमिर खान आणि अनुष्का शर्मा.
आमिर आणि अनुष्का 19 डिसेंबर रोजी रिलीज होत असलेल्या 'पीके' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. अभिनेता म्हणून आमिर बॉलिवूडमध्ये उच्च स्थानावर आहे. मात्र उंचीत तो जरा मागे पडतो. पण तो एक असा अभिनेता आहे, ज्याच्यासोबत बी टाऊनमधील प्रत्येक अभिनेत्री काम करु इच्छिते.
आमिर खानची उंची 5 फूट 6 इंच आहे आणि अनुष्काची उंची 5 फूट 9 इंच आहे. या दोघांच्या उंचीत बरेच अंतर आहे. जेव्हा अनुष्का हाय हिल्स घालून इव्हेंटमध्ये आमिरसोबत पोहोचते, तेव्हा आमिर तिच्यासमोर खूप ठेंगणा दिसतो.
एकेकाळी जास्त उंचीमुळे पूजा बत्रा, युक्ता मुखी, सुश्मिता सेन या अभिनेत्रींचे करिअर फ्लॉप ठरले. मात्र आता जास्त उंची असलेल्या अभिनेत्रींसोबत (कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, लारा दत्ता, सोनाक्षी सिन्हा) काम करण्यास ठेंगण्या हीरोंचा मुळीच आक्षेप नसतो. शिवाय बी टाऊनमध्ये सारखी उंची असलेले बरेच हीरो-हिरोईन आहेत. मात्र बघताना अभिनेत्री हीरोच्या तुलनेत उंच दिसते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बॉलिवूडमधील ऑनस्क्रिनच्या अशाच काही जोड्यांविषयी...