आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Tragedy Queen Meena Kumari\'s Life Story

B\'Day: मीना कुमारी होत्या परपुरुषांबरोबर मद्याचा आस्वाद घेणा-या पहिल्या अभिनेत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('साहब बीबी और गुलाम' सिनेमातील एका दृश्यात गुरुदत्त आणि मीना कुमारी)
मुंबई - बॉलिवूडमध्ये दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग म्हणून तर मीना कुमारी यांना ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखले जाते. मीना कुमारी यांच्या अभिनयाची एक वेगळीच छाप होती. त्यांचा अभिनय बघून प्रेक्षकांच्या डोळ्यांत आपोआप अश्रू तरळायचे.
गुरुदत्त यांच्या 'साहिब बीवी और गुलाम' या सिनेमातील 'छोटी बहू' जणू मीना यांच्या खासगी आयुष्यात सामील झाली होती. मीना कुमारी पहिल्या अशा अभिनेत्री होत्या, ज्या बॉलिवूडमधील परपुरुषांसोबत बसून दारु प्यायच्या.
असे म्हणतात, की धर्मेंद्र यांनी प्रेमात दगा दिल्यानंतर त्या दारुच्या आहारी गेल्या होत्या. 1 ऑगस्ट 1932 रोजी जन्मलेल्या मीना यांनी 31 मार्च 1972 रोजी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्या आपल्या मागे एकाहून एक उत्कृष्ट सिनेमांचा गुलदस्ता सोडून गेल्या.
मीना कुमारी यांचे सुरुवातीचे जास्तीत जास्त सिनेमे पौराणिक कथांवर आधारित होते. मीना कुमारी यांच्या पदार्पणामुळे भारतीय सिनेसृष्टीत नवोदित अभिनेत्रींचा एक काळ सुरु झाला होता. यामध्ये नर्गिस, निम्मी, सुचित्रा सेन आणि नूतन यांचा समावेश होता. 1953 पर्यंत मीना कुमारी यांचे तीन सिनेमे रिलीज झाले होते. यामध्ये 'दायरा', 'दो बीघा जमीन' आणि 'परिणीता' या सिनेमांचा समावेश होता. 'परिणीता' या सिनेमापासून मीना कुमारी यांच्यासाठी एक नवीन युग सुरु झाले होते. या सिनेमातील त्यांनी साकारलेल्या भूमिकेने भारतीय महिलांना प्रभावित केले होते. या सिनेमात भारतीय स्त्रियांना सामान्य आयुष्यात येणा-या अडचणींचे चित्रण करण्यात आले होते. मात्र याच सिनेमामुळे मीना कुमार यांची इमेज दुःखी भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून तयार झाली होती. त्यामुळे त्यांना बॉलिवूडच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखले जाते.
'साहब बीवी और गुलाम' हा सिनेमा कुणीही विसरु शकत नाहीत. 1962 मध्ये या सिनेमासह 'मैं चुप रहूंगी' आणि 'आरती' या सिनेमासाठी त्यांना एकाचवेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची तीन नामांकने मिळाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, कसे होते मीना यांचे राजकुमार यांच्यापासून ते कमाल अमरोही यांच्यासोबतचे नाते आणि कशाप्रकारे त्या बनल्या परपुरुषांसोबत बसून दारु पिणा-या पहिल्या अभिनेत्री...