आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओळखा पाहू कोण आहेत हे चाइल्ड आर्टिस्ट, जे बनले बी टाऊनमधील हीरो-हिरोईन, PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, जुगल हंसराज (वर), आफताब शिवदासानी)
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली. यापैकी काही स्टार्स हिट झाले तर काही फेल. असाच एक अभिनेता म्हणजे आफताब शिवदासानी.
आफताबने नुकताच आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. 25 जून 1978 रोजी जन्मलेल्या आफताबसाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास होता. कारण लग्नानंतरचा हा त्याचा पहिला वाढदिवस होता. यावर्षी 11 जून रोजी एका खासगी समारंभात आफताबने त्याची गर्लफ्रेंड निन दुसांजसोबत लग्न केले. म्हणजेच यंदाचा वाढदिवस आफताबने आपल्या पत्नीसोबत साजरा केला.
आफताबने लहानपणीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बालपणापासून लाइट, कॅमेरा, अॅक्शन हे शब्द ऐकत तो मोठा झाला. मात्र हीरोच्या रुपात झळकल्यानंतर त्याला अपेक्षित यशाची चव चाखता आली नाही.
'मिस्टर इंडिया' आणि 'चालबाज' या सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून झळकलेल्या आफताबला खरी ओळख 'मस्त' या सिनेमाद्वारे मिळाली. या सिनेमात उर्मिला मातोंडकर त्याची हिरोईन होती. खास गोष्ट म्हणजे उर्मिलानेसुद्धा आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली.
फिल्म इंडस्ट्रीत बालकार म्हणून करिअर सुरु करणा-या कलाकारांची यादी मोठी आहे. आफताब आणि जुगल हंसराजसारखे कलाकार बॉलिवू़डमध्ये विशेष यशस्वी होऊ शकले नाही, तर उर्मिला मातोंडकर बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडमधील अशाच काही चाइल्ट आर्टिस्टविषयी...