आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

One film Wonders: पहिला सिनेमा हिट झाल्यानंतर हे स्टार्स निघून गेले अज्ञातवासात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - ग्रेसी सिंग)
मुंबई - आमिर खानच्या ब्लॉकबस्टर 'लगान' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री ग्रेसी सिंग लवकरच सिल्व्हर स्क्रिनवर कमबॅक करणार आहे. रणवीर शौरीच्या 'ब्लू माउंटेन' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत कमबॅकची तयारी ग्रेसीने केली आहे. ग्रेसी बी टाऊनमधील अशी एक अभिनेत्री आहे, जिचा पहिला सिनेमा हिट झाला, मात्र या सिनेमाच्या यशाचा तिच्या करिअरला विशेष फायदा झाला नाही.
आमिर खानच्या 'लगान'पूर्वी ग्रेसी दोन सिनेमांमध्ये झळकली होती. मात्र तिला खरी ओळख ही 'लगान'मुळेच मिळाली होती. 'गंगाजल' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमांमध्ये तिने काम केले होते. मोजके सिनेमे केल्यानंतर जणू तिच्या करिअरला उतरती कळा लागली आणि अल्पावधीतच ती फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली.
असे म्हटले जाते, की बॉलिवूडमध्ये पुढे जाण्यासाठी एका यशस्वी ब्रेकची गरज असते. मात्र येथे अशा स्टार्सची लांबलचक यादी आहे, जे पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाल्यानंतर लाइमलाइटमधून गायब झाले. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच काही स्टार्सविषयी...