आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाची पस्तीशी-चाळीशी ओलांडूनदेखील या अभिनेत्रींचे अद्याप व्हायचे आहेत दोनाचे चार हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दिव्या दत्ता आणि प्रिती झिंटा)
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 25 सप्टेंबर 1977 रोजी एका पंजाबी कुटुंबात दिव्याचा जन्म झाला. दिव्या फिल्म इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची आई डॉक्टर आहे. दिव्या सात वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. एकट्या आईनेच तिचे आणि तिच्या भावाचे पालनपोषण केले.
‘बागवान, ’भाग मिल्खा भाग, ’दिल्ली 6', ’गिप्पी’, ’स्टेनले का डब्बा’, ’रागिनी एमएमएस’ यांसह अनेक सिनेमांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणा-या दिव्याने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी पंजाबी टीव्ही कमर्शिअल्समध्ये काम केले होते. आजही सर्व निर्णय आईच्या सल्ल्यानेच घेत असल्याचे दिव्या सांगते. वयाची 37 वर्षे पूर्ण करणारी दिव्या आजही सिंगल आहे.
बातम्यांनुसार, 2005 मध्ये ले. कमांडर संदीप शेरगिलसोबत दिव्याचा साखरपुडा झाला होता. मात्र काही कारणास्तव त्यांचे लग्न मोडले. दिव्या बी टाऊनमधील अशी एक अभिनेत्री आहे, जिच्या अफेअरची कधी चर्चा रंगली नाही.
प्रिती झिंटा
बॉलिवूडच्या अविवाहीत अभिनेत्रींमध्ये प्रिती झिंटाचा पहिला नंबर येतो. क्रिकेटर युवराज सिंह आणि उद्योगपती नेस वाडियासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आलेल्या प्रितीने अद्याप लग्न केलेले नाहीये. 38 वर्षांची झालेल्या या अभिनेत्रीचे नाव सिनेमा निर्माता शेखर कपूरसोबतसुध्दा जोडण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, वयाची पस्तीशी आणि चाळिशी ओलांडलेल्या अविवाहित अभिनेत्रींविषयी...