आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'Day: काळानुसार एवढी बदलली अभिनेत्री साधना, पाहा इतर अभिनेत्रींचा लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री साधना शिवदासानी)
मुंबई - गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे साधना शिवदासानी. साधना आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 सप्टेंबर 1941 रोजी कराची, पाकिस्तान (त्याकाळी सिंध, ब्रिटिश इंडिया)मध्ये साधना यांचा जन्म झाला. प्रसिद्ध नृत्यांगणा साधना बोस यांच्या नावावर त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले.
बालकलाकाराच्या रुपात साधना यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. सर्वप्रथम त्या राज कपूर यांच्या 'श्री 420' या सिनेमातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या गाणयात कोरस गर्लच्या रुपात झळकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'अबना' या सिंधी सिनेमात काम केले होते.
बॉलिवूडमध्ये हिरोईनच्या रुपात त्या सर्वप्रथम आर के नायर यांच्या 'लव्ह इन शिमला' या सिनेमात झळकल्या होत्या. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान साधन यांचे आर. के. नायर यांच्यासोबत सूत जुळले आणि त्यांनी लग्न केले. 1995मध्ये अस्थमामुळे नायर यांचे निधन झाले.
साधन यांचे निवडक सिनेमे...
'हम दोनों' (1961), 'एक मुसाफिर एक हसीना' (1962), 'असली नकली' (1962), 'वो कौन थी' (1964), 'मेरा साया' (1966), 'इंतकाम' (1969), 'एक फूल दो माली' (1969), 'आप आए बहार आए' (1971), 'गीता मेरा नाम' (1972), 'अमानत' (1975) आणि 'तुलसी' (1985).
एकेकाळी आपल्या सौंदर्य आणि हेअरस्टाइलमुळे प्रसिद्ध झालेल्या साधन आता कशा दिसतात, हे तुम्ही वरील छायाचित्रात बघू शकता.. पुढील स्लाईड्सवर एक नजर टाका आणि पाहा साधनासह गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री आता कशा दिसतात...