आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: कधी \'वायरस\', कधी \'अस्थाना\', या आहेत बोमनच्या गाजलेल्या 11 भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता बोमन इराणी)
मुंबईः अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते बोमन इराणी आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बोमन यांनी आपल्या चौदा वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'मुन्ना भाई MBBS' (डॉक्टर जे.सी. अस्थाना), '3 इडियट्स' (डॉक्टर वीरू सहस्त्रबुद्धे), 'फरारी की सवारी' (बेहराम देबू), 'जॉली LLB' (तेजिंदर राजपाल), 'भूतनाथ रिटर्न्स' (भाऊसाहेब) यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी कधी विनोदी, कधी नकारात्मक तर कधी गंभीर स्वरुपाच्या भूमिका साकारल्या.
बोमन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. त्यानंतर काही जाहिरातींमध्ये ते झळकले. फँटा (कोल्डड्रिंक), सीएट टायर या जाहिरातींमध्ये ते झळकले. क्रॅकजॅक बिस्किटच्या जाहितीतून ते प्रकाशझोतात आले. या जाहिरातीत ते मिस्टर जॅक म्हणून झळकले होते. 2001 मध्ये 'एव्हरीबडी सेज आय एम फाइन' या सिनेमाद्वारे त्यांनी फिल्मी दुनियेत एन्ट्री घेतली. त्यानंतर 'लेट्स टॉक', 'डरना मना है', 'बूम' या सिनेमांत ते झळकले. मात्र त्यांना खरे यश हे 'मुन्ना भाई MBBS' या सिनेमाने मिळवून दिले. या सिनेमात त्यांनी साकारलेला डॉ. जे.सी. अस्थाना भाव खाऊन गेला.
'3 इडियट्स'साठी मिळाला फिल्मफेअर
आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या '3 इडियट्स' या सिनेमात बोमन झळकले होते. या सिनेमात त्यांनी कॉलेजचे डीन डॉ. वीरु सहस्त्रबुद्धेंची भूमिका साकारली होती. विद्यार्थ्यांमध्ये ते वायरस नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अभिनय एवढा दमदार होता, की त्यांना प्रेक्षकांना हसवले आणि रडवलेसुद्धा. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. बोमन यांना हिंदीसोबतच इंग्रजी, गुजराती, मराठी आणि बंगाली भाषा बोलता येतात.
आज बोमन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या गाजलेल्या 11 भूमिकांविषयी सागंत आहोत...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...