आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता बोमन इराणीचा मुलगा केयोज बॉलिवूडमध्ये एन्ट्री करायला सज्ज झाला आहे. करण जोहरच्या आगामी 'स्टुंडेंट ऑफ द इयर' या सिनेमात केयोज झळकणार आहे.
केयोजने याआधी करीना कपूर आणि इम्रान खानच्या 'एक मैं और एक तू' या सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. आता तो करणच्या सिनेमातून अभिनेता म्हणून सगळ्यांसमोर येणार आहे.
'स्टुडेंट ऑफ द इयर' या सिनेमातून केयोजबरोबर महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट, डेविड धवनचा मुलगा वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हा नवोदित कलाकार बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहेत.
सिद्धार्थ आणि वरुणनेसुद्धा याआधी 'माय नेम इज खान' या सिनेमाचं सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं.
'स्टुडेंट ऑफ द इयर' हा रोमॅण्टीक कॉमेडी सिनेमा असून याची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मिळून केली आहे.
गर्भवती महिलांसाठी विद्या बालन ठरतेय आदर्श
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.