आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अँक्टर बोमन ईराणी त्यांच्या आगामी चित्रपट 'फरारी की सवारी' साठी खुप उत्साहीत आहेत. हा चित्रपट पारिवारिक असल्याचे बोमन यांनी सांगितले. बोमन यांनी सांगितले की, आत्तापर्यंत या चित्रपटातीलसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात एक बालकलाकर देखील काम करत असून त्यामुळॆ देखील चांगला प्रतिसाद मिळत असावा.
चित्रपटाविषयी दर्शकांचा कसा प्रतिसाद मिळॆल हे आत्ता सांगता येणार नाही पण हे नक्की सांगू शकतो की आम्ही एक उत्तम प्रतिचे प्रोडक़्ट तयार केले आहे. येणार्या 'आइफा अवॉर्डस 2012' मध्ये हा चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे. एका साधारण माणसाच्या असणार्या मोठ्या असणार्या स्वप्नांवर हा चित्रपट आधारीत आहे. हा चित्रपट पारिवारिक असल्याने पालक आणि मुल या चित्रपटाची मजा एकत्रित लूटू शकतात.
आइफा अवॉर्डसवर बोमन यांची प्रतिक्रिया - 'मी बर्याच वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी होत आहे. अवॉर्ड समारोहामध्ये मला जाण्याची आवड आहे. अशा कार्यक्रमांमध्ये सगळ्या कलाकारांची भेट घेण्याची संधी मिळते. इथे आल्याने जुन्या मनातील असणार्या कटूता संपून जातात.
रविवारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोमन ईरानी आणि शरमन जोशी यांनी लोकप्रिय टीव्ही धारावाहिक 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या सेटवर उपस्थित होत. यावेळी मुख्य कलाकार दिशा वखानी (दया) आणि दिलीप जोशी (जेठलाल) यांच्या सोबत गर्भा खेळाचा आनंद लूटला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.