आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boney Kapoor, Jhanvi And Sridevi At Her Sister's Birthday Bash

श्रीदेवीच्या बहिणीच्या बर्थडे पार्टीत पोहोचली शाहरुखची पत्नी गौरी, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- गौरी खान आणि श्रीदेवी पती बोनी कपूरसह)
मुंबई - अभिनेत्री श्रीदेवी शुक्रवारी रात्री आपल्या बहिणीच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाली होती. बहीण श्रीलताच्या बर्थडे पार्टीत श्रीदेवीसह तिचे कुटुंबीय सहभागी झाले होते. पती बोनी कपूर आणि मुलगी जान्हवीसह श्रीदेवी पार्टीत सामील झाली. या बर्थडे पार्टीचे आयोजन मुंबईतील ऑलिव्ह अॅण्ड बार किचनमध्ये करण्यात आले होते.
बर्थडे पार्टीत बी टाऊनमधील इतर सेलेब्सही सहभागी झाले होते. यामध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खान, करण जोहर, महीप कपूर, संजय कपूर, दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अरुणोद्य सिंह यांचा समावेश होता. यावेळी श्रीदेवी व्हाइट प्रिंटेड शर्ट आणि जेगिंग्समध्ये दिसली. तर गौरी खान व्हाइट प आणि ब्लू जीन्समध्ये होती.
श्रीदेवी आणि तिची बहीण श्रीलता यांच्यात कौटुंबिक वादामुळे गेल्या काही वर्षांपासून बोलणे बंद होते. मात्र आता वाद मिटल्यामुळे दोघी बहिणी एकत्र आल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...