आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'2 स्टेट्स\'चा निर्मिती खर्च 35 कोटी, तरुणाई भावणार हा सिनेमा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शुक्रवारी साजिद नाडियाडवालाची निर्मिती असलेला '2 स्टेट्स' हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रिंट आणि प्रचाराचा एकुण खर्च मिळून सिनेमाचा निर्मिती खर्च 35 कोटींच्या घरात आहे. निर्मात्यांनी जोखीम पत्करत संपूर्ण जगात या सिनेमाचे वितरण यूटीव्ही/डिस्नेमार्फत करण्याचा निर्णय घेतला.
चेतन भगतच्या गाजलेल्या '2 स्टेट्स'या कादंबरीवर आधारित या सिनेमाची तरुणाई ब-याच काळापासून प्रतिक्षा करत होते. अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट स्टारर हा सिनेमा तरुणाईत लोकप्रिय होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
उत्तर भारतीय तरुण आणि दाक्षिणात्य तरुणी यांच्या प्रेमकहाणीवर हा सिनेमा आधारित आहे. चार दशकांपूर्वी याच थीमवर एल. व्ही. प्रसाद यांनी एक दुजे के लिए हा सिनेमा बनवला होता. आता भूतनाथ रिटर्न्स आणि मैं तेरा हीरो हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत असताना '2 स्टेट्स' हा सिनेमा आपली कमाल दाखवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या 'भूतनाथ रिटर्न्स' आणि 'मैं तेरा हीरो' या सिनेमाच्या बिझनेसविषयी..