या आठवड्यात 'हमशकल्स' सिनेमा प्रदर्शित झाला. दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाच्या या सिनेमाचे सर्व अधिकार निर्माता वासू भगनानीने 72 कोटींमध्ये फॉक्स स्टार स्टुडिओला विकले आहेत. प्रिन्ट आणि प्रचारासह सिनेमाचा एकुण खर्च 90 कोटी रुपये आहे.
मल्टिस्टारर सिनेमा असूनदेखील केंद्रीय बिंदू दिग्दर्शक साजिद खान आहे. 'हाउसफुल' सीरीज आणि 'हे बेबी'च्या रुपात त्याने आतापर्यंत तीन सुपरहिट सिनेमे बनवले आहेत. 'हिम्मतवाला'च्या रिमेकमध्ये त्याच्याकडून काही चुका झाल्यात.
कॉमेडीचे त्याला खोलवर ज्ञान आहे. 'हमशकल्स' हा त्याच्या कम्फर्ट झोनचा सिनेमा असल्याचे जास्त अपेक्षा केल्या जात आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, मागील सर्व अपयश विसरून त्याने 14 महिन्यात मल्टिस्टारर सिनेमा बनवून रिलीज करण्यात यशस्वी ठरत आहे.
हे त्याचे धाडस आणि कामाप्रति असलेला विश्वासाचे प्रतीक आहे. हिमेश रेश्मियाचे यशस्वी आणि मधुर संगीत सिनेमाला हिट होण्यास मदत करू शकते.
मागील आठवड्यात रिलीज झालेल्या 'फग्ली'ने उद्योगाच्या बाबतीत निर्मात्याला आणि स्टार्सना नाराज केले. सिनेमाने पहिल्या दिवशी अडीच कोटी रुपये कमावले. सिनेमाची आठवड्याची कमाई 13 कोटी झाली आहे. या सिनेमाच्या अपयशाचे प्रमुख दोन कारणे आहे- पहिले म्हणजे, सिनेमाचे शिर्षक कॉमेडी दर्शवते. मात्र सिनेमात तसे काहीच नसून आजच्या युवा पिढीच्या गंभीर समस्यांवर आधारित आहे.
दुसरे कारण म्हणजे, एकही गाणे सिनेमा रिलीज होण्यापूर्वी हिट होऊ शकले नाही. निर्मात्यांनी सिनेमा स्वत: वितरित केला होता, त्यामुळे त्यांना नुकसान झेलावे लागले.
दुस-या आठवड्यात 'हॉलिडे'च्या यशाची गाडी पुढे धावत राहिली. 32 कोटींचा आठवड्याचा व्यवसाय करून सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. नायक
अक्षय कुमारच्या 'हॉलिडे'चा प्रभाव चांगला असल्याने निर्माता अक्षय कुमारच्या 'फग्ली' बघण्याची लोकांना इच्छाच झाली नाही.