आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनिकांतसमोर आमिर-सलमान फेल, देश-परदेशात रचला विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- आमिर खान आणि रजनिकांत)
मुंबई- रजनिकांत यांना सुपरस्टार का म्हटेल जाते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिध्द केले आहे. त्यांचा 'लिंगा' सिनेमा रेकॉर्ड कायम ठेवत पहिल्या तीन दिवसांतच 100 कोटींच्या घरात सामील झाला आहे. 'लिंगा' रजनिकांत यांच्या वाढदिवसानिमित्त अर्थातच 12 डिसेंबरला रिलीज झाला होता. ट
रजनिकांत यांचा कोणताही सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो एक नवीन विक्रम रचतो.
यावेळीसुध्दा त्यांनी दक्षिण इंडस्ट्रीसह देश-परदेशात अनेक विक्रम रचले आहेत. सिनेमाने पहिल्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. रजनिकांत यांचे स्टारडम बॉलिवूडच्या अनेक सिनेमे आणि सुपरस्टार्सपेक्षा जास्त आहे. 'लिंगा'ने 'धूम 3'च्या ओपनिंग डेचासुध्दा विक्रम मोडित काढला आहे.
'लिंगा'चे नवीन रेकॉर्ड
1. तामिळनाडूमध्ये 'लिंगा'ने पहिल्या दिवशी 12.8 कोटींची कमाई केली. त्यांनी 'कथ्थी' (12.5 कोटी रुपये)चा रेकॉर्ड मोडला आहे.
2. 'लिंगा'ने पहिल्या दिवशी 37 कोटीं रुपये कमावले. तसेच, विजयच्या 'कथ्थी'ने 23.45 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
3. पहिल्या आठवड्यात 'लिंगा'ने चेन्नईमध्ये सर्वाधिक कमाई 2.70 कोटींचा बिझनेस केला. यापूर्वी 'अंजान'ने 2.36 कोटींचा व्यवसाय केला होता.
4. 'लिंगा'ने यूएसमध्ये 8.41 कोटींचा आणि कॅनडामध्ये 4.24 लाखांचा बिझनेस केला आहे. तसेच, 'कथ्थी'ने यूएसमध्ये 3.42 कोटी आणि कॅनाडामध्ये 3.55 लाख रुपये कमावले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रजनिकांतने आमिर, शाहरुख आणि सलमानसह अनेक स्टार्सचे विक्रम मोडित काढले...