आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOX OFFICE : वीकेंड व्यवसायावर आर्थिक गणित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात 'हेट स्टोरी-2', थ्रीडी हॉरर 'पिझ्झा' आणि 'अमित साहनी की लिस्ट' प्रदर्शित झाले. टी-सिरीज आणि विक्रम भट्टने मिळून 'हेट स्टोरी-2'ची निर्मिती केली आहे. प्रिंट व प्रचाराच्या खर्चासहीत चित्रपटाचा एकूण खर्च 12 कोटी रुपये इतका झाला आहे. हा फक्त प्रौढ प्रेक्षकांसाठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. दोन वर्षांपासून सरकारी सक्तीमुळे कोणत्याही प्रौढ चित्रपटातील दृश्ये कापून पुन्हा सेन्सर करून टीव्हीवर दाखवणे शक्य झाले नाही. या नव्या नियमानुसार, अशा सर्व प्रौढ चित्रपटांचे व्यावसायिक गणित फक्त थिएटरमध्ये होणार्‍या कमाईवर आधारित बनले आहे.
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' यशस्वी झाला असून तो 'एक व्हिलन'च्या व्यवसायाच्या तुलनेत मागे आहे. एका महिन्याच्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या दोन युवा अभिनेत्रींचे हे चित्रपट सुरुवातीच्या गर्दीच्या वजनाला रेखांकित करते. 'एक व्हिलन'ने पहिल्या दिवशी 16 कोटी आणि वीकेंडला 50 कोटींचा व्यवसाय केला. साप्ताहिक व्यवसाय 75 कोटी इतका झाला असून चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया'ने पहिल्या दिवशी 9 कोटी कमवले आणि वीकेंड 32 कोटी रुपयांचा झाला.
साप्ताहिक व्यवसाय 50 कोटी आणि एकूण 70 कोटी व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या आठवड्यातील व्यवसायाला 'इनिशियल'म्हटले जाते. याचे विशेष महत्त्व असल्याकारणाने असे म्हटले जाते की, 'इनिशियल इज द नेम ऑफ द गेम.' 20-20 क्रिकेटशी याची तुलना केली तर सुरुवातीचा व्यवसाय पहिल्या 6 ओव्हरमधील फलंदाजीच्या समान आहे. 90 टक्के सामन्याचा निर्णय या ओव्हरवरच अवलंबून असतो.