आज
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'द शौकीन्स' हा सिनेमा रिलीज झाला. यावर्षी रिलीज झालेला हा अक्षयचा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी त्याचे 'हॉलिडे' आणि 'एन्टरटेन्मेंट' हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. अक्षयच्या सिनेमांच्या संख्येवर तो बी टाऊनचा सर्वाधिक बिझी स्टार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सिनेमांव्यतिरिक्त अक्षय जाहिरांतीमध्येही बिझी असतो.
सिनेमे, जाहिरातींव्यतिरिक्त अक्षयने यावर्षी छोट्या पडद्यावर प्रसारित झालेला 'डेअर टू डान्स' हा रिअॅलिटी शोसुद्धा होस्ट केला होता.
आपल्या एवढ्या बिझी शेड्युलमधून अक्षय आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला मुळीच विसरत नाही. बिझी शेड्युलमधून वेळ काढत तो पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांना कधी शॉपिंगला तर कधी आउटिंगला नक्की घेऊन जात असतो.
मुलगा आरवला देता अधिक वेळ...
अक्षयचा मुलगा आरव आता 12 वर्षांचा झाला आहे. या वयात आपल्या मुलाला वडिलांची जास्त गरज आहे, हे अक्षय ठाऊक आहे. आरवसोबत अक्षय एका मित्रासारखा वागतो. तो अनेकदा त्याला सिनेमे दाखवायला घेऊन जातो. अक्षयला स्वतः खेळाची विशेष आवड आहे, ही आवड त्याच्या मुलालासुद्धा आहे. फावल्या वेळेत अक्षय आरवसोबत व्हॉलीबॉल खेळतो.
ट्विंकलसाठी असतो नेहमी फ्री...
अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. मात्र आजही अक्की ट्विंकलसाठी आवर्जुन वेळ काढत असतो. अवॉर्ड फंक्शन असो किंवा पार्टी, अक्षय नेहमी ट्विंकलसोबत दिसतो. याशिवाय हे दोघे अनेकदा फिल्म्स बघायला थिएटरमध्येदेखील येत असतात. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अक्षय परदेशात सुटी एन्जॉय करायला जात असतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबतची अक्षयची खास झलक...