आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींवर अंधश्रद्धेचा प्रचार केल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि काही जणांविरोधात अंधश्रद्धेचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली आरोपाखाली शुक्रवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे. अमिताभ यांच्याविरोधात तशी न्यायलयाने तक्रार दाखल करून घेतली आहे.
महाराष्ट्र प्रतिबंध आणि निर्मुलनच्याअंतर्गत मानवी हत्या आणि इतर अमानुष हत्या, वाईट आणि आघोरी आचरण आणि ब्लॅक मॅजिक कायदा 2013नुसार, हेमंत पाटील यांनी बच्चन आणि इतर सहकारी यांच्यावर तक्रार दाखल करण्याची मागणी केलीय. टी.व्हीवर `कॉम्प्लान`च्या जाहिरातीत बच्चन यांनी भूताचा अभिनय केलाय. यांचसंदर्भात ही तक्रार करण्यात आलीय.
बच्चन यांनी याआधी भूतांची भूमिका `भूतनाथ` मध्ये साकारली होती. याचाच पुढचा भाग `भूतनाथ रिटर्न` लवकरच रिलीज होणार आहे. `जाहिरातमध्ये भूतांचे अस्तित्व आणि त्यावरचा विश्वास, अशा खोट्या समजुती दाखवल्या आहेत. त्यामुळे अंधश्रध्दा वाढण्यास प्रोत्साहन मिळेल असे, पाटील यांनी म्हटलंय.
पाटील यांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी नकार दिला. त्याबद्दल मुंबई दंडाधिकारी सीता कुलकर्णी यांच्यासमोर 18 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.