आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाच्या पोस्टरवर मुलांना दाखवले अश्लिल कृत्य करताना, राम गोपाल वर्माच्या विरोधात तक्रार दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: 'सावित्री'चे वादग्रस्त पोस्टर
मुंबई: सिनेमा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त पोस्टरमुळे वादात अडकले आहेत. दक्षिण भारतीय सिनेमा 'सावित्री'च्या पोस्टरवर 13 वर्षांच्या मुलाला अश्लिल व्यवहार करताना दाखवल्याने बालहक्क संरक्षण राज्य आयोगाने (SCPCR) राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात बाल अधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आयोगाने त्यांना नोटीस पाठवून याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.
वक्तव्यामुळे वादात अडकलेले आहेत रामगोपाल वर्मा
राम गोपाल वर्मा यांनी टीनेजरची स्वत:ची एक 'सावित्री' असते. ती त्याची बहीण, शिक्षिका, मैत्रीण किंवा शेजारी असू शकते. असे म्हणून त्यांनी एकदा वादाला तोंड फोडले होते. या वक्तव्यावर SCPCRने नाराजी व्यक्त केली होती.
अश्लिल दृश्यांमध्ये मुलांना सामील करणे कायद्याने गुन्हा आहे
अश्लिल किंवा अभद्र दृश्यांमध्ये मुलांना सामील करणे भारतीय दंड संहिता कलम 292च्या उप कलम 1 आणि 2 अंतर्गत गुन्हा मानला जातो. त्यासाठी पाच वर्षांची किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेत तरतूद करण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राम गोपाल वर्माच्या 'सावित्री'च्या वादग्रस्त पोस्टर्सची छायाचित्रे...