आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CCL 5: क्रिकेटच्या पिचवर बॉबी, डेजी शाहसह दिसले अनेक बॉलिवूड स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[CCL5च्या सेमी फायनल मॅचवेळी मैदानावर उपस्थित डेजी शाह (डावीकडे), बॉबी देओल (उजवीकडे वर) आणि स्नेहा उलाल (उजवीकडे खाली)]
मुंबईः रविवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या पाचव्या पर्वाची सेमी फायनल फेरी रंगली. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तेलगू वॉरियर्स (कर्णधार - वेंकटेश) आणि चेन्नई राइनो (कर्णधार - जीवा) या दोन संघात हा सामना रंगला. वेंकटेशच्या तेलगू वॉरियर्सने हा सामना जिंकला. त्यापूर्वी मुंबई हीरोज आणि तेलगू वॉरियर्स यांच्यात सेमी फायनल मॅच रंगली होती. मुंबई हीरोज ही अभिनेता सोहेल खानची टीम असून बॉबी देओल कर्णधार आहे.
सेमी फायनल मॅच बघण्यासाठी आणि सेलिब्रिटी खेळाडूंना चिअरअप करण्यासाठी अनेक प्रसिद्ध चेहरे फील्डवर दिसले. बॉबी देओल, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, सोहेल खान, स्नेहा उलाल, दलेर मेहंदी, डेजी शाह, शब्बीर अहलुवालिया, वरुण बडोला, अर्पिता खान शर्मा, धनुष अक्षरा हासन, लीसा हेडन, हुमा कुरैशी, रजनीश दुग्गल, आणि चार्मी कौरसह अनेक सेलिब्रिटी यावेळी येथे उपस्थित होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा CCL-5 च्या सेमी फायनल मॅचवेळी क्लिक झालेली बॉलिवूड सेलेब्सची खास छायाचित्रे...