आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: भेटा शाहरुख-सलमान-कंगनासह या सेलिब्रिटींच्या बहिणींना, ज्यांना फार कमी लोक ओळखतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कंगना रनोटची बहीण रंगोली, सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि शाहरुख खानची बहीण शहनाज लालारुख)
बी टाऊनमध्ये सध्या सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या लग्नाची चर्चा आहे. यापूर्वी अर्पिता खान एवढी चर्चेत कधीच नव्हती. सुपरस्टार सलमान खानची बहीण आणि घरी चित्रपटांची पार्श्वभूमी असूनदेखील अर्पिताने कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही.
अर्पिता सलमानचे वडील सलीम खान आणि त्यांच्या दुस-या पत्नी हेलन यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. या कुटुंबातील जवळजवळ सर्वच सदस्य फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. मात्र सलमानच्या दोघी बहिणी अलविरा खान आणि अर्पिता खान यांनी सिनेमात काम करण्याचा कधी विचार केला नाही.
अर्पिताच्या संगीत सेरेमनीत पोहोचलेल्या शाहरुखने म्हटले होते, की निमंत्रण नसते तरीदेखील तो अर्पिताच्या लग्नात सहभागी झाला असता. कारण अर्पिता त्याला धाकट्या बहिणीप्रमाणे आहे. तसे पाहता शाहरुखला एक सख्खी मोठी बहीण आहे. तिचे नाव शहनाज लालारुख असे आहे. फार क्वचित ती कॅमे-यासमोर येत असते.
शाहरुखची बहीण शहनाज लालारुख
शाहरुखच्या मोठ्या बहिणीचे नाव शहनाज लालारुख आहे. शाहरुखच्या संघर्षाच्या काळात शहनाजने त्याला पूर्ण साथ दिली होती. आईवडिलांच्या निधनानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. शहनाजला कॅमे-यासमोर येणे पसंत नाहीये. ती क्वचितच पार्टी किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसत असते. अगदी साधारण आयुष्य जगायला शहनाजला आवडते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अर्पिता आणि शहनाजव्यतिरिक्त आणखी काही सेलिब्रिटींच्या कॅमे-यामागे राहणा-या बहिणींविषयी...