आपल्या आवडत्या स्टारविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. या स्टार्सच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्स एक चांगले माध्यम ठरले आहे.
ट्विटर आणि
फेसबुकवर सेलिब्रिटीज केवळ आपल्या सिनेमाविषयीची माहितीच नव्हे, तर ट्रॅव्हलिंग स्टेट्स आणि आपली खासगी छायाचित्रेसुद्धा शेअर करत असतात.
काही स्टार्सची छायाचित्रे त्यांच्या चाहत्यांमध्ये बरीच लोकप्रियसु्द्धा होतात. बॉलिवूडचा किंग
शाहरुख खान सोशल साइट्सवर जास्त अॅक्टिव आहे. शाहरुख सोशल मीडियाचा वापर केवळ आपल्या व्यवसायासाठीच नव्हे तर कुटुंबापासून दूर असल्यावर मुलांचे फोटो शेअर करुन आपल्या भावनासुद्धा व्यक्त करण्यासाठी करत असतो.
अनेकदा शूटिंगच्या निमित्ताने बाहेर असताना किंग खान 'मिस यू'च्या मेसेजसह आपल्या मुलांची छायाचित्रे शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक जुने छायाचित्र शेअर केले. या छायाचित्रात तो मिशीत दिसतोय. या फोटोसह शाहरुखने लिहिले होते, ''वेगळ्या भूमिकेसाठी हा लूक कसा आहे.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्टार्सची काही अशीच छायाचित्रे...