आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: पाहा रितेश-जेनेलियाचा Wedding Album, पोहोचले होते अनेक सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रितेश देशमुख आणि जेनेलियाला बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. गेल्या महिन्यात सलमान खानची बहीण अर्पिताच्या मुंबईत झालेल्या रिसेप्शनमध्ये जेनेलिया आणि रितेशचे क्यूट मोमेंट्स कॅमे-यात बंदिस्त झाले होते. 25 नोव्हेंबरला रितेश आणि जेनेलिया आई-बाबा झाले. त्यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलाची एन्ट्री झाली असून त्यांनी आपल्या बाळाचे नाव रिआन असे ठेवले आहे. 17 डिसेंबर रोजी रितेशचा 37 वा वाढदिवस होता.
3 जानेवारी 2012 रोजी जेनेलिया आणि रितेश विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.

लग्नानंतर एका ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी टाऊनमधील अनेक मंडळी या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आशुतोष गोवारिकर आणि त्यांची पत्नी, सैफ अली खान, करीना कपूर, अमृता राव, सलमान खानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा, काजोल, अजय देवगण, श्रीदेवी, बोनी कपूर, रेखा, सुश्मिता सेन, जॅकलिन फर्नांडिस, साजिद खान, मलायका अरोरा खानसह बी टाऊनमधील बरेच सेलिब्रिटी या दोघांच्या लग्न आणि रिसेप्शन पार्टीत पोहोचले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जेनेलिया-रितेशच्या लग्न आणि तेथे पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...