मुंबईः प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुश रविवारी लग्नगाठीत अडकला. लंडनची रहिवाशी असलेल्या तरुणासोबत रविवारी धुमधडाक्यात कुश बोहल्यावर चढला. नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर रावसह अनेक मान्यवर लग्नात पोहोचले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुश आणि तरुणा यांना आशीर्वाद दिला. शिवाय त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना मिठाईसुद्धा भरवली. शत्रुघ्न यांनी सहपरिवार दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना लग्नासाठी आमंत्रित केले होते. भावाच्या लग्नात सामील झाल्याने सोनाक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.