आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉस्मेटिक सर्जरीने पालटले बी टाऊनच्या या अभिनेत्रींचे रुप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोठ्या पडद्यावरील कलाकारांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कलाकारांनीसुद्धा सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. 'उतरन' या लोकप्रिय मालिकेत झळकणारी अभिनेत्री रश्मी देसाईने लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिपोसक्शन सर्जरी केल्याची बातमी अलीकडेच आली होती. रश्मि मात्र लिपोसक्शन सर्जरी नव्हे तर पित्ताशयाची सर्जरी केल्याचे म्हटले आहे.
असो, रश्मि जे म्हणत असावी, त्यात कदाचित सत्यता असावी. मात्र एन्टरटेन्मेंट वर्ल्डमध्ये कलाकारांनी कॉस्मेटिक सर्जरी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषतः मोठ्या पडद्यावरील कलाकार यामुळे चर्चेत असतात. गेल्याच महिन्यातील गोष्ट आहे, अभिनेत्री अनुष्का शर्माने ओठांवर शस्त्रक्रिया केल्याची बातमी विशेष चर्चेत होती. अनुष्का मात्र ही गोष्ट अफवा असल्याचे म्हणत होती. बातमी तर ही देखील होती, की शस्त्रक्रिया योग्यपद्धतीने न झाल्यामुळे अनुष्काच्या ओठांचा आकार बिघडला होता.
केवळ अनुष्काच नव्हे तर जुही चावला, श्रुती हसन, शिल्पा शेट्टी, कंगना राणावत आणि राखी सावंतपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीची मदत घेतली आहे. एक नजर टाकुया या अभिनेत्रींवर...