आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sohail Khan, Aamir Khan, Padmini Kolhapure Eloped To Get Married

आमिरने रीनासोबत पळून जाऊन केले होते लग्न, प्रेमासाठी या CELEBSनेही पुकारला होता बंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडून, पहिली पत्नी रीनासोबत आमिर खान, सोहेल खान पत्नी सीमासोबत आणि पद्मिनी कोल्हापुरे पती प्रदीप शर्मासोबत)
असं म्हणतात, की प्रेम आधंळ असतं. आपल्या प्रेमासाठी कुणीही काहीही करायला तयार असतो. प्रियकर-प्रेयसी प्रेमासाठी बंड पुकारण्यातही मागेपुढे बघत नाहीत. अगदी सामान्यांप्रमाणेच बी टाऊनचे सेलिब्रिटीदेखील आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. प्रेमासाठी बी टाऊनचे काही सेलिब्रिटी आपल्या घरच्यांच्या विरोधात गेले. त्यांनी चक्क पळून जाऊन लग्न केले. यापैकी काही सेलिब्रिटींचा संसार आजही सुरळीत सुरु आहे, तर काहींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अभिनेता सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान यांनी पळून जाऊन लग्न केले होते. सोहेल आज आपला 44 वा वाढदिवस (जन्मः 20 डिसेंबर1970) साजरा करत आहे. दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या रुपात त्याला ओळखले जाते.
सोहेलप्रमाणेच अभिनेता आमिर खाननेसुद्धा पहिली पत्नी रीनासोबत पळून जाऊन लग्न केले होते. मात्र आता या दोघांचा घटस्फोट झाला असून आमिरने दुसरा संसार थाटला आहे. तर सोहेल पत्नी सीमासोबत हॅपी मॅरिड लाइफ जगतोय.
या दोघांप्रमाणेच आणखी कोणकोणत्या सेलिब्रिटींनी पळून जाऊन आपला संसार थाटला ते सांगत आहोत...